सेनगाव शहरातील टी पॉइंट परिसरात युवक काँग्रेसच्या वतीने महागाई व बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. रास्ता रोको केल्यामुळे वाहण्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मोदी सरकार विरूद्ध घोषणा बाजी करत भाववाढी व बेरोजगारी विरूद्ध घोषणा देण्यात आल्या. मोर्चा वेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदारांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.