मोठी बातमी! मुंबईत FDA ची धडक कारवाई; मालाडमधील Blinkit गोदामाला टाळं

गोदामात मोठ्या प्रमाणावर झुरळांचा प्रादुर्भाव होता. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. तसेच कोल्ड स्टोरेजच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले.

मोठी बातमी! मुंबईत FDA ची धडक कारवाई; मालाडमधील Blinkit गोदामाला टाळं

 मुंबईत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावलं उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरू असतानाच मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर प्रकार समोर आले आहेत. दहिसरमध्ये नामांकित दूध कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट दूध तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर मालाडमध्ये Blink Commerce Pvt. Ltd. च्या गोदामातील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन FDA च्या कारवाईत समोर आले आहे. मालाडमधील Blink Commerce Pvt. Ltd. च्या गोदामाची FDA अधिकाऱ्यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी तपासणी केली. या तपासणीत अन्नपदार्थांच्या साठवणुकीबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. गोदामात मोठ्या प्रमाणावर झुरळांचा प्रादुर्भाव होता. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. तसेच कोल्ड स्टोरेजच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान मुदत संपलेले तसेच खराब झालेले पॅकबंद खाद्यपदार्थ आढळून आले. फळे आणि भाज्यांच्या साठ्याजवळही मोठ्या प्रमाणावर झुरळे आढळल्याने अन्नपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. अन्नसाठ्याचे व्यवस्थापन करताना FIFO आणि FEFO या पद्धतींचे पालन होत नसल्याचेही समोर आले. याशिवाय, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि कीटक-उंदीर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या असल्याचे FDA अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीशी संबंधित आवश्यक नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

या गंभीर त्रुटींची दखल घेत FDA ने Blink Commerce Pvt. Ltd. चा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. परवाना निलंबित असताना संबंधित ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री किंवा वितरण करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दहिसरमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अमूल आणि गोकुळ यांसारख्या ब्रँडच्या नावाचा वापर करून बनावट दूध विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे मुंबईत अन्नपदार्थांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number