जय महाराष्ट्र, मुंबई
सोशल नेटवर्कींग साइट्स आपल्या जीवनशैलीचा महत्तवाचा भाग बनला आहे. अशातचं जर आपल्याला समजले व्हॉट्सअॅप बंद होणार आहे, तर ही बातमी आपल्यासाठी शॉकिंग असेल. ब्लॅकबेरीमुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम अडचणीत आले आहे.
फेसबुकवर एक खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला ब्लॅकबेरीने दाखल करून, त्यात फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी, आपली टेक्निक वापरण्यात आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हे त्यांचे पेटंट असल्याचा दावा ब्लॅकबेरीने केला आहे. एकेकाळी ब्लॅकबेरी मेसेंजर युसर्जसमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. जी टेक्निक फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम मध्ये वापरण्यात आली आहे ती टेक्निक ब्लॅकबेरीने डेव्हलप केली आहे. असा दावा ब्लॅकबेरीने केला आहे.
फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप या तिन्ही अॅपसाठी आपल्या फीचरची नक्कल करत ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स’चं उल्लघंन केल्याचा आरोप करत ब्लॅकबेरीनं फेसबुकविरोधात, लॉस एंजेलिसमधील फेडरल कोर्टात हा खटला दाखल केला आहे. जर यात ब्लॅकबेरीचा विजय झाला तर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम बंद होऊ शकतं किंवा या कंपनीला ब्लॅकबेरीला सर्वात मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.