अंधश्रद्धेच्या काट्यांवर लोटांगण; अमरावतीतील पाशवी प्रथा पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील !

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती अमरावतीच्या वडनेर गंगाई येथे संत झगेश्वर महाराज यांच्या यात्रेमध्ये शेकडो वर्षांपासून एक अघोरी प्रथा चालू आहे. ही प्रथा आहे काट्यांवर लोटांगण घेण्याची. याही वर्षी इथल्या भक्तांनी ही प्रथा पुढे चालू ठेवत रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घेतलं. असं रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घेतल्यानं आयुर्वेदिक उपचार होतात, असा या भक्तांचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात तर […]

अंधश्रद्धेच्या काट्यांवर लोटांगण; अमरावतीतील पाशवी प्रथा पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील !

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

अमरावतीच्या वडनेर गंगाई येथे संत झगेश्वर महाराज यांच्या यात्रेमध्ये शेकडो वर्षांपासून एक अघोरी प्रथा चालू आहे. ही प्रथा आहे काट्यांवर लोटांगण घेण्याची. याही वर्षी इथल्या भक्तांनी ही प्रथा पुढे चालू ठेवत रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घेतलं. असं रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण घेतल्यानं आयुर्वेदिक उपचार होतात, असा या भक्तांचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात तर या भक्तांच्या अंगातून भळभळा रक्त वाहत असतं.

यामध्ये लहान मुलांपासून वृध्दांचाही सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या 400 वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात. महाराष्ट्रातील अनेक गावांत अशा प्रकारच्या अघोऱ्या प्रथा आजही चालू असल्याचे दिसून येते.

विवेकबुध्दीने विचार करत श्रध्दा जोपासल्यास अशा अघोरी प्रथांना सुरूंग लावणं शक्य होईल, अशा भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number