भाजपाचा प्रत्युत्तर मोर्चा रद्द

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने संवेदनशील निर्णय घेत शनिवार, १ जुलै रोजी मुंबईत होणारे भाजपाचे ‘आक्रोश आंदोलन’ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. आशिष शेलार म्हणाले की, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दुःखाचा डोंगर […]

भाजपाचा प्रत्युत्तर मोर्चा रद्द

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने संवेदनशील निर्णय घेत शनिवार, १ जुलै रोजी मुंबईत होणारे भाजपाचे ‘आक्रोश आंदोलन’ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

आशिष शेलार म्हणाले की, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दुःखाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्याही सहवेदना आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहचले आहेत. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही, पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number