‘भाजपाची मुख्यमंत्रीपदाची पूर्वतयारी’

अजित पवारांच्या पक्ष फोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचा गट फुटल्यानंतर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीअजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भोपाळच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करत ७० हजार कोटीचा आणि […]

‘भाजपाची मुख्यमंत्रीपदाची पूर्वतयारी’

अजित पवारांच्या पक्ष फोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचा गट फुटल्यानंतर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीअजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भोपाळच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करत ७० हजार कोटीचा आणि शिखर बँकेचा उल्लेख केला होता. १० ऑगस्ट नंतर विधानसभा अध्यक्षांना १६ आमदारांचे निलंबन करावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा रिक्त होते. त्यासाठीची ही पूर्वतयारी तयारी आहे. शिंदे गट फुटल्यानंतर अजित पवारांनी त्रास दिला असे त्यांचे सहकारी सांगत होते. आता त्याच अजित पवारांच्या हाताखाली ते काम करणार आहेत. असं काहीतरी घडणार आहे याची मला चाहूल होती. आणि आज ते घडलं. जनतेला गृहीत धरू नका जनता मूर्ख नाही. भ्रष्टाचारी सरकारचे काय होते. ते कर्नाटकच्या जनतेने दाखवले आहे. महाविकास आघाडी अभेद आहे. मोदींची विशेष स्टाईल आहे. ईडीचा, केंद्रीय संस्थांचा वापर करायचा. महाविकास आघाडी एकत्रित लढली तर भाजपा निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही. नरेंद्र मोदी सत्येत राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभने देतील. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागेल. माझे सरकार सर्वांनी मिळून पाडले. त्यावेळी मी फक्त ७० हजार कोटी खर्च करून जर राज्यात सिंचन वाढले नसेल तर सिंचनाची काय सध्य परिस्थिती आहे हे विचारलं होतं. शपथविधीचे चित्र पाहताना एकेक चेहरे समोर आले. त्यांच्यासाठी पवार साहेबांनी काय केले आहे. हे आम्ही जवळून पाहिले आहे. आतापर्यंत आपण मनी लॉन्ड्रीग पाहिले होते. आता मिनिस्टर लॉन्डिंग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची इतकी अधोगती होईल असं वाटलं नव्हतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number