‘भाजपाचं हिंदुत्व बेगडी’

अजित पवारांच्या पक्ष फोडीनंतर राज्यभरात अनेक चर्चाना उधाण आले आहे. अनेकजण यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘भाजपाचं हिंदुत्व बेगडी’ असल्याचं वक्तव्य केलं आहे. “सर्वपक्ष दादांसोबत आहे. आमचा पक्ष फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. शरद पवार आमचे आदर्श आहेत. शरद पवार, अजित पवार म्हणजे […]

‘भाजपाचं हिंदुत्व बेगडी’

अजित पवारांच्या पक्ष फोडीनंतर राज्यभरात अनेक चर्चाना उधाण आले आहे. अनेकजण यावर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘भाजपाचं हिंदुत्व बेगडी’ असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“सर्वपक्ष दादांसोबत आहे. आमचा पक्ष फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. शरद पवार आमचे आदर्श आहेत. शरद पवार, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस” असं राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं. अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. काल जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात व्हिप कोणाचा लागू होणार? मुख्य प्रतोद कोण? असे प्रश्न मिटकरींना विचारण्यात आले.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
त्यावर त्यांनी रात्री ११ नंतर झालेली पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही, असं उत्तर दिलं. ‘सर्व आमदार इथे आहेत. काही आमदार वाटेवर आहेत’ असं अमोल मिटकरी म्हणाले. नऊ आमदारांनी शपथ घेतली म्हणून ते पक्ष नाहीत, या जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, ‘मी, ती पत्रकार परिषद पाहिलेली नाही’ असं उत्तर मिटकरींनी दिलं.

अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मिटकरी म्हणाले की, “काही कार्यकर्ते उतावीळ असतात, नारेबाजी करतात, काळ फासतात. जितेंद्र आव्हाड यांनी फोटोला लागलेलं काळ पुसलं ही दुसरी बाजू आहे. उतावीळ कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा अपमान करु नय़े. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षात असे उतावीळ कार्यकर्ते असतात.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number