भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भापज कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर कांग्रेसने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी मनोज कोटक यांच्या मुलुंड येथील कार्यालयाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहण्यात आली.
मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे महिला आणि पुरूष कार्यकर्ते जमले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मनोज कोटक यांच्य कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.