वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपला जोरदार झटका बसला आहे.
हिमाचलमधील भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल पराभूत झाले आहेत.
प्रेम कुमार धुमल मात्र सुजनपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्याने हिमालचमध्ये भाजपा समोर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. कारण पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हिमाचलमध्ये प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले होते.