‘गुणरत्न सदावर्तेंना भाजपाचा पाठिंबा’ – संजय राऊत

एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला […]

‘गुणरत्न सदावर्तेंना भाजपाचा पाठिंबा’ – संजय राऊत

एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. हा, विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठीचे हे फंडिंग केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शुक्रवारचा पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा त्यातलाच एक भाग असल्याचे संजय राऊत म्हणाले.’

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number