मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे भाजपने मतपत्रिकांवर निवडणुका घेऊन ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे तो काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. जे जे जिंकले त्यांच अभिनंदन , यात भाजप असेल किंवा कॉग्रेस असेल अशी  प्रतिक्रिया कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर […]

मतपत्रिकांवर निवडणुका घ्या, शंका मिटवा – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे भाजपने मतपत्रिकांवर निवडणुका घेऊन ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे तो काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जे जे जिंकले त्यांच अभिनंदन , यात भाजप असेल किंवा कॉग्रेस असेल अशी  प्रतिक्रिया कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी दिली. भाजप्रशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल 2019 साली कळेल, असेही उद्धव यांनी यावेळी म्हटले.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत केली. त्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हानं व यशापयशाचा सामना करावा लागतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number