जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अवघी काही महिने राहिले असले तरी भाजपाने आत्तापासूनच महापालिकेच्या नाड्या आवळायला सुरवात केली आहे. त्यातच आता भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना थेट ऑफर देण्यास सुरुवात केली असून दोन्ही पक्षातील 20 पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपाच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे.
यामुळे नजीकच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नगरसेवक सोडचिठी देतील अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे.
यामध्ये मिरजेतील सात कुपवाडचे तीन, सांगलीचे 11 तर सांगलीवाडीचे काही नगरसेवक सुद्धा भाजपाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही महिने महापालिकेतील घडामोडी पाहण्यासारख्या असणार आहेत. येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अनेक नगरसेवक भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता भाजपा सूत्रांकडून चर्चिली जात आहे.