Bihar BJP Candidate List 2025: भारतीय जनता पक्षाने मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत एकूण 71 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये खास लक्ष वेधणारी बाब म्हणजे सात वेळा आमदार राहिलेले नंद किशोर यादव यांचे पाटणा साहिबमधून तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी रत्नेश कुशवाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादीत आणखी काही प्रमुख बदल दिसून आले आहेत. औराईमधून रामसुरत राय, रीगामधून मोतीलाल प्रसाद यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, सिवानमधून आरोग्यमंत्री मंगल पांडे, आणि सीतामढीमधून जेडीयूचे माजी खासदार सुनील कुमार पिंटू यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यादीतील काही निवडणूक संभाव्य ठिकाणांवर उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
बेतिया – रेणू देवी
रक्सौल – प्रमोद कुमार सिन्हा
पिप्रा – श्यामबाबू प्रसाद यादव
मधुबन – राणा रणधीर सिंग
मोतिहारी – प्रमोद कुमार
ढाका – पवन जैस्वाल
रिगा – बैद्यनाथ प्रसाद
बथनाहा – अनिलकुमार राम
परिहार – गायत्री देवी
सीतामढी – सुनीलकुमार पिंटू
बेनिपट्टी – विनोद नारायण झा
खजौली – अरुण शंकर प्रसाद
बिस्फी – हरिभूषण ठाकूर बच्चौल
राजनगर – सुजित पासवान
झांझारपूर – नितीश मिश्रा
छटापूर – नीरजकुमार सिंग
नरपतगंज – देवंती यादव
फरीदपूर – विद्या सागर केसरी
सिक्टी – विजयकुमार मंडळ
किशनगंज – स्वीटी सिंग
बनमंखी – कृष्णकुमार ऋषी
पूर्णिया – विजयकुमार खेमका
कटिहार – तारकिशोर प्रसाद
प्राणपूर – निशा सिंग
कोऱ्हा – कविता देवी
सहरसा – आलोक रंजन झा
गौरा-बौरम- सुजित कुमार सिंग
दरभंगा – संजय सरावगी
केवती – मुरारी मोहन झा
जाले – जीवेशकुमार मिश्रा
औराई – रमा निषाद
कुधनी – केदार प्रसाद गुप्ता
बरुराज – अरुणकुमार सिंग
साहिबगंज – राजू कुमार सिंग
बैकुंठपूर – मिथिलेश तिवारी
सिवान – मंगल पांडे
दारुंडा – कर्णजित सिंग
गोरेयाकोठी – देवेश कांत सिंग
तरैय्या – जनक सिंह
अमनूर – कृष्णकुमार मंटू
हाजीपूर – अवधेश सिंग
लालगंज – संजयकुमार सिंग
पाटेपूर – लखेंद्रकुमार रोशन
मोहिउद्दीननगर – राजेशकुमार सिंग
बछवारा – सुरेंद्र मेहता
तेघरा – रजनीश कुमार
बेगुसराय – कुंदन कुमार
भागलपूर – रोहित पांडे
बंका – राम नारायण मंडळ
कटोरिया – पुरण लाल तुडू
तारापूर – सम्राट चौधरी
मुंगेर – कुमार प्रणय
लखीसराय – विजय कुमार सिन्हा
बिहार शरीफ – सुनील कुमार
दिघा – संजीव चौरसिया
बंकीपूर – नितीन नवीन
कुम्हार – संजय गुप्ता
पटना साहिब – रत्नेश कुशवाह
दानापूर – रामकृपाल यादव
बिक्रम – सिद्धार्थ सौरव
बरहार – राघवेंद्र प्रताप सिंग
आरा – संजय सिंग वाघ
तारारी – विशाल प्रशांत
अरवाल – मनोज शर्मा
औरंगाबाद – त्रिविक्रम सिंह
गुरुआ – उपेंद्र डांगी
गया शहर – प्रेम कुमार
वजीरगंज – बिरेंद्र सिंग
हिसुआ – अनिल सिंग
वारिसालीगंज – अरुणा देवी
जमुई – श्रेयसी सिंग
हेही वाचा – राज ठाकरे प्रथमच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत, मुंबई महापालिका एकत्र लढणार असल्याची नांदी
तिकीट रद्द झाल्याबद्दल नंद किशोर यादव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयासोबत आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. नवीन पिढीचे स्वागत आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. पाटणा साहिबच्या लोकांनी मला सात वेळा विजयी केले आहे आणि त्यांनी दिलेले प्रेम कधीही विसरणार नाही. मी सर्वांचा आभारी आहे.’
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा बिहार विधानसभा चुनाव-2025 के लिए चयनित सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं विजयश्री की अग्रिम शुभकामनाएं।#आएगी_NDA pic.twitter.com/vENiqKpx1w — BJP Bihar (@BJP4Bihar) October 14, 2025
भाजपकडून उर्वरित जागांसाठी उमेदवारांची घोषणा पुढील यादीत करण्यात येईल. या पहिल्या यादीने बिहारच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली असून, नंद किशोर यादव यांचे तिकीट रद्द होणे अनेकांमध्ये आश्चर्याची बाब ठरली आहे.