आंगणेवाडीत होणार भाजपाची सभा

आंगणेवाडी जत्रेच्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी कोकणातील पहिलाच भाजपचा मेळावा होणार आहे या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्याचा समवेत भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहे या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे. […]

आंगणेवाडीत होणार भाजपाची सभा

आंगणेवाडी जत्रेच्या दिवशी ४ फेब्रुवारी रोजी कोकणातील पहिलाच भाजपचा मेळावा होणार आहे या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्याचा समवेत भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते हजेरी लावणार आहे या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंगणेवाडीच्या जत्रेला येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा असते. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आंगणेवाडी जवळील भोगलेवाडी येथील माळरानावर घेण्याच्या तयारीत आहे. भाजपचे अनेक नेते या भव्य सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी खास वैशिष्ठयपूर्ण असं स्टेज बनवण्यात आलंय, ज्या स्टेजवर तब्बल साडे पाचशे पदाधिकारी बसु शकतात. स्टेजच्या समोर तब्बल ५० हजारहून अधिक जनसमुदाय असेल. हे स्टेज फोर्थ डायमेंशन हि कंपनी उभारत असुन १८० बाय ८० आकाराचं आणि ५० फुट उंचीचं हे स्टेज आहे. स्टेजवर एका बाजुला मंत्री, सरपंच, दुस-या बाजुला उपसरपंच व अन्य पदाधिकारी अशी एखाद्या राजदरबारासारखी अगदी वैशिष्ठयपुर्ण बैठकव्यवस्था करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number