मणिपूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले महिनाभर हिंसाचार सुरु असून शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानांना आग लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. यात केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या निवासस्थानास गुरुवारी आग लावण्यात आली होती तर अन्य एका ठिकाणी भाजपचे आमदार बिश्वजीत आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शीघ्र कृती दलाच्या जवानांनी त्यांना वेळीच रोखले. तसेच सिंजेमाई येथील भाजपचे कार्यालय आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष शारदादेवी यांच्या पोराम्पेट येथील निवासस्थानास देखील लक्ष्य केले होते पण जवानांनी वेळीच कारवाई करत त्यांना पिटाळून लावले. शुक्रवारी सुरक्षा दलाचे जवान आणि जमावामध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या यात दोन नागरिक जखमी झाले आहेत.