‘गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. गोवा विधानसभा निडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मापसा येथली बोडगेश्वर येथे सभा घेतली. गोव्यातील बोडगेश्वराचे दर्शन घेत पंतप्रधानांनी निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात केली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात गोव्यातूनच झाली असून यंदाही गोव्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र […]

‘गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. गोवा विधानसभा निडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मापसा येथली बोडगेश्वर येथे सभा घेतली.

गोव्यातील बोडगेश्वराचे दर्शन घेत पंतप्रधानांनी निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात केली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात गोव्यातूनच झाली असून यंदाही गोव्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींकडून दिवंगत पर्रीकर आणि फ्रांसिस डिसूजा यांचे स्मरण करण्यात आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, गोव्यामध्ये विकास कामांमुळे सुवर्णयुग तयार झाला आहे. तसेच पर्यटक लक्षणीयसुद्धा वाढले. त्यामुळे गोव्याचा आता झालेला विकास दहा वर्षापूर्वी हवा होता, असे ते म्हणाले. गोव्यात चांगल्या सुविधा दिल्या नसत्या तर येथे पर्यटक आले असते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उत्तर गोव्याचा विकास होत असेल तर दक्षिण गोव्याचाही विकास होणार. भाजपाने स्वयंपूर्ण स्वप्न पाहिले असून गोव्यातील प्रत्येक क्षेत्राचा विकास भाजप पूर्ण करू शकते, असेही ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. विरोधकांनी गोव्याला लुटायचे केंद्र बनवले आहे. मी गोव्यातून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असल्याचे ते म्हणाले. मात्र काँग्रेसने गोवामुक्ती संग्राम संपवण्याचे काम केले आहे. तर काँग्रेसमुक्त भारत हा नागरिकांचा संकल्प आहे.

भाजपासाठी गोव्याचा एकत्रित विकास हाच मूलमंत्र आहे. तर पर्यटन वाढीतून गोव्यात भाजप उद्यम विकास साधणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गोवा भाजपच्या सोबत आहे कारण गोव्यातील नागरिकांना आपलं कोण, आपला विकास कोण घडवणार हे माहित आहे. काँग्रेस गोव्यातील तरुणांची स्वप्न कधीच समजू शकला नाही. तर काँग्रेसमुळे स्वातंत्र्यानंतरही गोवा १५ वर्ष गुलामगिरीत होता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number