रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस

आज भारतातील दिग्गज चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक असलेले रविंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन. त्यांना गुरुदेव या नावाने देखील संबोधले जाते. त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. 20 व्या शतकात त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील साहित्यातील पहिले गीतकार […]

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस

आज भारतातील दिग्गज चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक असलेले रविंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन. त्यांना गुरुदेव या नावाने देखील संबोधले जाते. त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. 20 व्या शतकात त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.

रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील साहित्यातील पहिले गीतकार आहेत. रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेली जन गण मन आणि आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत आणि बांग्लादेश या देशांची यांची राष्ट्रगीते आहेत.इतकेच नव्हे तर श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन झाले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातील काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number