गुजरातला बिपरजॉयचा सर्वाधिक फटका

बिपरजॉय चक्रीवादळ जखौ किनारपट्टीला धडकल्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे व खांब कोसळले. वादळामुळे भावनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर २२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. कच्छ, मांडवी, नलिया, नारायण सरोवर, जखौ बंदर, मुंद्रा आणि गांधीधाम, अहमदाबादमध्ये राज्यभर मुसळधार पाऊस पडत आहे. ताशी ९० […]

गुजरातला बिपरजॉयचा सर्वाधिक फटका

बिपरजॉय चक्रीवादळ जखौ किनारपट्टीला धडकल्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे व खांब कोसळले. वादळामुळे भावनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर २२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

गुजरातमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. कच्छ, मांडवी, नलिया, नारायण सरोवर, जखौ बंदर, मुंद्रा आणि गांधीधाम, अहमदाबादमध्ये राज्यभर मुसळधार पाऊस पडत आहे. ताशी ९० ते १२५ किमी वेगाने वारे वाहत आहेत. संपूर्ण मांडवीत १८ तासांपासून वीज नाही. यामुळे लोक त्रस्त आहेत. कच्छमध्ये गेल्या २४ तासात २ ते ७ इंच पाऊस झाला आहे.

यावेळी ताशी १२५ ते १४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. नंतर वाऱ्याचा वेग 108 किमी प्रतितास इतका कमी झाला. भुजमध्ये ५ इंचापर्यंत पाऊस झाला आहे. द्वारका आणि भुजमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number