मुंबई, २९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली स्टार किड आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. परंतु तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.सुहानाने अनेक फोटोज समाज माध्यमांवर चर्चेत ठरतात. नुकताच समाज माध्यमांवर सुहाना खान हिचा एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय.सुहाना खान हिचा हा फोटो बिकिनीमधील आहे. या फोटोमध्ये सुहाना ही एका समुद्र किनारी बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये सुहाना खान हिचा लूक अत्यंत हॉट दिसतेय.यापूर्वी कधीच सुहाना खान ही इतक्या जास्त हॉट लूकमध्ये दिसली नव्हती.
समाज माध्यमांवर सुहाना कायम सक्रिय असते.सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सुहाना ‘दि आर्चीस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय विश्वात पदार्पण करणार असून सध्या सर्वत्र सुहाना हिच्या अभिनयाची चर्चा आहे.समाज माध्यमांवर देखील सुहानाच्या फोटोंची चर्चाअसते. सुहाना खानच्या ‘दि आर्चीस’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.आता तो लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकताच पूर्ण झाले आहे.
दि आर्चीस’ च्या या पार्टीत सुहाना खान आणि अगत्स्य नंदा एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच नाही तर, प्रत्यक्ष आयुष्यात देखील दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. बॉलिवूडच्या गॉसिप्समध्ये दोघे एकमेकांना प्रेम प्रकरण करत असल्याची चर्चा देखील रंगली आहे.