जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा भाऊबीजनिमित्त बहिणीला भेटायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली. विठ्ठल अंभोरे असे या दुचाकी स्वाराचे नाव आहे. शनिवारी भाऊबीज करुन घरी परतताना वडनेर भोलजी गावाजवळ हा अपघात घडला. एका अज्ञात वाहनाच्या धडकेने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.