वृत्तसंस्था, बिहार
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात गुरुवारी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. याप्रकरणी न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह 16 जणांना दोषी ठरवले आहे.
वकील विंदेश्वरी प्रसाद यांच्या निधनामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. तर, दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.