Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे अडकला लग्नबंधनात, कोण आहे जीवनसाथी? फोटो समोर

‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकल्याची बातमी समोर आली आहे.

Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे अडकला लग्नबंधनात, कोण आहे जीवनसाथी? फोटो समोर

‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकल्याची बातमी समोर आली आहे. या संबंधित एक पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केली आहे. यावेळी त्याने फक्त ‘Finally’ हा एकच शब्द कॅप्शनमध्ये लिहला आहे. यावेळी त्याने गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले असून त्याच्या पत्नीने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. दोघांनीही मुंडावळ्या बांधल्या आहेत. तसेच या फोटोमध्ये शिव ठाकरे मुंडावळ्या बांधून दिसत आहे. तर त्याची पत्नी पाठमोरी आहे.

हेही वाचा- Big Boss Marathi Season 6 : ‘800 खिडक्या आणि 900 दारं’; यंदाच्या आलिशान घराचा चक्रव्यूह पाहिलात का?

मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस हिंदीच्या 16 व्या सिझनमध्ये शिव ठाकरे सहभागी झाला होता. त्यावेळेस तो उपविजेता ठरला होता. त्यानंतर चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. आता गुपचूप लग्न उरकल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. शिव ठाकरेने पोस्ट केलेला हा फोटो तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा- Big Boss Marathi 6: दार उघडणार, नशिबाचा खेळ पालटणार’; बिग बॉस मराठीच्या घरात हे 17 स्पर्धक दाखल
शिवच्या भूतकाळाबद्दल बोलायच झालं तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात त्याची ओळख टीव्ही स्टार वीणा जगतापसोबत ओळख झाली होती. अनेकदा ते दोघ एकत्र पाहायला मिळाले त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. पण काही कारणाने त्यांचं नातं तुटलं त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता त्याने त्याच्या वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात केली आहे. दरम्यान शिव ठाकरेने अद्याप आपल्या पत्नीचा चेहरा दाखवलेला नसून, तिच्या संबंधित कोणतीही अधिकृत माहिती त्याने सोशल मीडियावर टाकली नाही. त्यामुळे त्याची जीवनसाथी कोण? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 
 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number