भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातला सर्वांत वादग्रस्त तरीही लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या 12व्या पर्वाला सुरुवात झाली. पहिला भाग प्रदर्शित होताच या शो मधील एक स्पर्धक चर्चेचा विषय ठरलाय. हा स्पर्धक म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा…
यंदा ‘विचित्र जोडी’ अशी संकल्पना असलेल्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमात वेगवेगळ्या जोड्या सहभागी झाल्या आहेत. यांमध्ये भजन गायक अनुप जलोटा ‘बिग बॉस’च्या घरात जसलीन मथारू या आपल्य़ा शिष्येसोबत सहभागी झाले आहेत. मात्र सहभागी होतानाच दोघांनी आपलं नातं गुरू-शिष्येचंच नसून आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याचा गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे अनुप जलोटा यांचं वय 65 वर्षं आहे, तर त्यांच्या गर्लफ्रेण्डचं वय अवघं 28 वर्षं आहे. दोघांच्या वयात सुमारे 35 वर्षांचं अंतर आहे.

‘ऐसी लागी लगन, मीरा हो गईमगन’, ‘मैय्या मोरी, मै नही माखन खायो’ यांसारखी धार्मिक भजनं गाण्यासाठी नावलौकिक असणाऱ्या अनुप जलोटा यांची इमेज अत्यंत सोज्वळ आणि धार्मिक आहे, तर त्यांची शिष्या मात्र एकदम बोल्ड आणि हॉट अंदाजात प्रेक्षकांसमोर आली.

दोघांच्या वयातील अंतर आणि दोघांची इमेज यामुळे सूत्रसंचालक सलमान खानही चाट पडला. यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधांवरून कार्यक्रमातच चेष्टामस्करीही सुरू झाली. मात्र ही चेष्टामस्करी तेवढ्यावरच न राहाता ट्विटरवरही जोरदार ट्रोलिंग सुरू झालं.
Never underestimate a man who sings Bhajans. Or for that matter who’s only 65 years young. ?#AnupJalota — SUHEL SETH (@suhelseth) September 16, 2018
कुणी अनुप जलोटा यांना मुली आकर्षित करण्याचं तंत्र शिकवण्याची गमतीदार विनंती केली आहे, तर कुणी प्रियंका चोप्रा निक जोनस यांच्या वयातील अंतराची तुलना अनुप जलोटा आणि जसलीन यांच्याशी करत खिल्ली उडवली आहे. यामध्ये केआरके, सुहेल सेठ यांसारख्या लोकांनीही अनुप जलोटा यांच्या गर्लफ्रेण्डवरून टर्र उडवली आहे.
Romantic songs are for kids, real men like Anup Jalota impress girls with bhajans. Respect. — EngiNerd. (@mainbhiengineer) September 16, 2018
To all the desperate singles and uncles Honey singh chodo #AnupJalota ke gaane suno — Sandip (@_cokeandchips_) September 16, 2018
Don’t Be Disappointed If You’re Still Single. Maybe She’s Not Born Yet ??? #AnupJalota #BB12 — Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) September 16, 2018
Miss Jasleen Matharoo’s Father director Mr. Matharoo made sex films during his entire life and shown girls with min cloths and today his daughter is dating 65 years old Anup Jalota. Karma doesn’t leave you. #BigBoss12 — KRK (@kamaalrkhan) September 16, 2018