Kolhapur Sarpanch Case Update : कोल्हापूर माजी सरपंच प्रकरणात मोठा ट्विस्ट! अनैतिक संबंधातून नव्हे तर ‘त्या’ कारणामुळे संपवलं; खरं कारण समोर

कोल्हापूरमधील शहापूर येथून माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Kolhapur Sarpanch Case Update : कोल्हापूर माजी सरपंच प्रकरणात मोठा ट्विस्ट! अनैतिक संबंधातून नव्हे तर ‘त्या’ कारणामुळे संपवलं; खरं कारण समोर

कोल्हापूरमधील शहापूर येथून माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला अनैतिक संबंधातून प्रियकरानेच त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सुरेखा न्यारे यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली नसून आर्थिक व्यवहारातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकाश पाटील याने पैशांच्या वादातून सुरेखा न्यारे यांना संपवल्याचा दावा केला जात आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, माजी सरपंच राहिलेल्या सुरेखा यांनी आपले स्वत:चे दागिने गहाण ठेवून प्रकाशला गाडी घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती. हेच गहाण ठेवलेले दागिने पुन्हा सोडवून देण्यासाठी सुरेखा यांनी प्रकाशकडे तगादा लावला होता. सुरेखा यांच्याकडून वारंवार होणारी पैशांच्या मागणीमुळे प्रकाशने सुरेखा यांच्या हत्येचा कट रचल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

हेही वाचा- Trainee IPS Officer Arrest: ‘खोलीत डांबलं, चाकूने धमकावलं अन् गळा आवळला…’; लैंगिक छळाचा आरोप असलेले IPS अधिकारी उदय कृष्ण रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

नेमकं प्रकरण काय? 
कोल्हापूरमधील शहापूर येथील माजी सरपंच सुरेखा न्यारे या आपला प्रियकर प्रकाश पाटील याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होत्या. त्याच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करत होत्या, त्यामुळे प्रकाशने सुरेखा यांची हत्या केल्याचं बोललं जात होत. प्रकाश पाटीलने गळा दाबून सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या केली. सुरेखा न्यारे आणि हत्या करणारा प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते अशी चर्चा गावात केली जात आहे. दरम्यान आरोपी प्रकाश विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तो कोल्हापूर येथे वर्ग केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number