राज्यातील बडे नेते दिल्लीत दाखल

महाराष्ट्रातील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नियोजित कार्यक्रम रद्द करत राजधानीत दाखल झाले. त्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करून […]

राज्यातील बडे नेते दिल्लीत दाखल

महाराष्ट्रातील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नियोजित कार्यक्रम रद्द करत राजधानीत दाखल झाले. त्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीवारी केली आहे. संरक्षण विषयक बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पवारांच्या दौऱ्यात राजकीय भेटी नसून पवारांचा दिल्ली दौरा प्रशासकीय असल्याची माहिती सुत्रांनुसार समोर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यातील नेत्यांचे दिल्लीवारीमागचे नेमके राजकारण काय? तसेच विरोधी पक्षनेते आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दिल्लीत पक्षांतर्गत बदलाबाबत चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली होती. आणि आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातील संघटनात्मक कामांची माहिती अमित शाह यांनी दिली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number