‘त्यापेक्षा’ मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बॉटनेटचा वापर करून जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडणाऱ्या ‘मिराई’ या सर्वात मोठय़ा सायबर हल्ल्यानंतर आता त्याहीपेक्षा मोठय़ा सायबर हल्ल्याची शक्यता आहे. यामुळे या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिलाय.  2016 मध्ये ‘मिराई’ नावाचा सायबर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला होता. […]

‘त्यापेक्षा’ मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बॉटनेटचा वापर करून जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडणाऱ्या ‘मिराई’ या सर्वात मोठय़ा सायबर हल्ल्यानंतर आता त्याहीपेक्षा मोठय़ा सायबर हल्ल्याची शक्यता आहे. यामुळे या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिलाय. 

2016 मध्ये ‘मिराई’ नावाचा सायबर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पडली होती. त्यावेळेस हल्लेखोराकडे पाच लाख वापरकर्त्यांचा तपशील उपलब्ध होता. आता याहीपेक्षा मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे.

या हल्लेखोराकडे तब्बल 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांचा तपशील उपलब्ध आहे. यामध्ये वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट वापरकर्त्यांचाही समावेश आहे. यामुळे या वेळेस अधिक धोका असल्याचे जागतिक सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले आहे. हा हल्लेखोर एकाच वेळी हल्ला करण्यापेक्षा हळूहळू हल्ले करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number