पंतप्रधानांकडून प्रचाराचं भूमिपूजन – राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आम्ही केलेल्या कामांचे उद्धाटन होत असल्याची टीका होत आहे. नेहेमीप्रमाणे गुरुवारी सकाळीही संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी शिवसेनेने केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच […]

पंतप्रधानांकडून प्रचाराचं भूमिपूजन – राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आम्ही केलेल्या कामांचे उद्धाटन होत असल्याची टीका होत आहे. नेहेमीप्रमाणे गुरुवारी सकाळीही संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी शिवसेनेने केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहेत. शिवसेनेने सुरू केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांचे भूमीपूजन करता येत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहेत. अडथळे पार करत शिवसेनेने सुरू केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला या कामांच्या उद्घाटनाची संधी मिळते आहे. शिवसेनेच्या कामांमुळेच त्यांना आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. संजय राऊत म्हणाले, हे शिवसेनेचे यश आहे. आम्ही जी कामे केली आहेत. ती कामे मी मोजून दाखवू शकतो. आमचे माजी महापौर सुनील प्रभू यांना विचारा, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी यावेळी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number