जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या भोईवाडा परिसरात दुचाकीचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगाने आलेली बाईक पोलिसांच्या बेरीकेडला धडकल्याने हा अपघात झालाय. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडलीय.
दुचाकीचा वेग इतका जोरात होता की त्याच्या धडकेने पेलिसांचे बेरिकेड लांब फेकले गेले आणि दुचाकी कित्येक फुट लांब फरफटत गेलीय. अपघाताची ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती चिंताजनक आहे.