जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक तुळशीदास भोईटे यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला.
पुण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक तुळशीदास भोईटे यांना अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष डॉ.श.ना. नवलगुंजकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, चित्रपट वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांना
या पुरस्काराने गौरवण्यात येते.