Bhiwandi News: चिकन शोरमा,पिझ्झा खाणं बेतलं जीवावर! 14 जणांना विषबाधा, तपास सुरु

विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या,पोटदुखी, मळमळ,जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती.रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे

Bhiwandi News: चिकन शोरमा,पिझ्झा खाणं बेतलं जीवावर! 14 जणांना विषबाधा, तपास सुरु

भिवंडी शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्या नंतर एका कुटुंबातील 6 व इतर असे एकूण 14 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.बाधित रुग्णांना मळमळ उलटी याचा त्रास जाणवू लागल्याने सर्व रुग्णांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरातील  दुकानातून चिकन शोरमा,पिझ्झा खरेदी करून दुपारी घरी नेऊन खाल्ले होते. त्यानंतर  संध्याकाळ पासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागले.दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या,पोटदुखी, मळमळ,जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती.रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे.

या घटनेतील रुग्णांमध्ये 6 पुरुष,6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.सध्या शांतिनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number