जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या अपघातात मृतांचा आकडा चार वर पोहोचला आहे. असून यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. दरम्यान ढिगा-याखाली 17 जण अडकल्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्कळ अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.