Bhigwan Kidnapping Case Update : भिगवण प्रकरणातील तरूणीचा ‘यू टर्न’, म्हणाली, ‘आता मला आईकडे…’

बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं आता तिचा जबाब बदलला आहे. 

Bhigwan Kidnapping Case Update : भिगवण प्रकरणातील तरूणीचा ‘यू टर्न’, म्हणाली, ‘आता मला आईकडे…’

भिगवण प्रकरण हे संपूर्ण राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात आता मोठा  ट्विस्टआला आहे. या प्रकरणातील मुलीनं तिचा जबाब बदलला आहे. बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं आता तिचा जबाब बदलला आहे. 

भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लीम समाजातील तरुणासोबत 17 फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला 20 फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती. 

हेही वाचा – Sharad Pawar Health Update : शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर 

20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number