भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील डेक्कन भागातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. खडकवासला पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने भिडे पुलावरून पाणी वाहत आहे.

भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

२४ जुलै, २०२४ पुणे : पुण्यातील डेक्कन भागातील भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे, वाहतूक बंद करण्यात आली आहे. खडकवासला पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने भिडे पुलावरून पाणी वाहत आहे. मुसळधार पावसामुळे अखेर पुणेकरांचा लाडका 'बाबा भीडे' पूल काही वेळात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 
बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की, पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण १०० टक्के भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number