रिसोड शहरात भव्य मिरवणूक

भावना गवळी यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात भव्य मिरवणूक निघाली आहे. 

रिसोड शहरात भव्य मिरवणूक

१५ जुलै, २०२४ वाशीम : भावना गवळी यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात भव्य मिरवणूक निघाली आहे.

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी १५ जुलै रोजी वाशीमच्या रिसोड शहरातून भावना गवळी यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रिसोड शहरात ठिकठिकाणी भावना गवळी यांचे स्वागत करण्यात आले. रिसोड शहर हे भावना गवळी यांचे मुळ गाव असून मागील पाच वेळा लोकसभेवर भावना गवळी निवडून आल्या होत्या. रिसोड तालुका हा अकोला लोकसभा मतदारसंघात येत असल्याने एकदाही भावना गवळी यांना आपल्या मुळ गावी विजयोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, विधान परिषदेवर २४ मते घेऊन भावना गवळी निवडून आल्याने वाशीम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number