जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाच्या दमदार बॅटिंगनं या परिसरातली धरणं भरुन वाहत आहेत.
गेले काही दिवस सुरु असलेल्या दमदार पावसानं भातसा धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. धरणात सध्या 136 पूर्णांक 55 मीटर पाण्याची पातळी आहे.
धरणाचे दरवाजे पूर्ण उघडण्यासाठी 142 मीटरपर्यंत पाणी पातळी लागते. पाण्यामुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी काही प्रमाणात दरवाजे उघडण्यात आले.