Mahaparinirvan Diwas: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.

Mahaparinirvan Diwas: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

आज 6 डिसेंबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायी अभूतपूर्व संख्येने उपस्थिती राहिले. कालपासूनच चैतन्यभूमीवर जनसागर जमू लागला होता. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरपूर्वक अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री शिदे यांनी देखील यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे विचार व्यक्त केले. 

श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात महत्त्वाची माहिती देत सांगितले की, हे भव्य स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. स्मारकाचे काम सध्या वेगाने सुरू असून त्याला गती देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी केले होते. इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असलेले हे स्मारक जागतिक दर्जाचे ठरणार आहे. येथे 450 फूट उंचीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार असून संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याची सरकारची तयारी आहे.

यावेळी फडणवीस यांनीडॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाचा उल्लेख करत एक उदाहरण सांगितले. ते म्हणाले, अलीकडेच मुंबईला भेट दिलेल्या अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याच्या गव्हर्नर यांनी काही महानगरांमध्ये वीजपुरवठा कमी पडण्याचे कारण सांगितले तेथे स्टेट ग्रीड आहे, पण नॅशनल ग्रीडची कमतरता आहे.

हेही वाचा: Beed Teachers Suspended: बीडमध्ये शिक्षण विभागाची धडक कारवाई; 14 शिक्षक निलंबित, कारण काय?

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, “वीज मंत्री म्हणून कामकाज पाहताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देश एकत्रित करणाऱ्या राष्ट्रीय वीज ग्रीडचा विचार मांडला. त्यामुळे भारतातील कोणत्याही प्रदेशातून दुसऱ्या भागात वीज पुरवठा सहज पोहोचवणे शक्य झाले. डॉ. आंबेडकरांचे हे दूरदृष्टीचे धोरण आजही देशाला सक्षम बनवणारे ठरते.”

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीतील लाखोंची उपस्थिती आणि निष्ठा पाहता, डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आणि समाजावरील त्यांचे योगदान याबद्दलचे मूल्य अनमोल असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: Indian Railway: विमानसेवेच्या अडचणीत रेल्वेचा मोठा दिलासा; रेल्वेने तत्काळ चार विशेष गाड्या चालवल्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number