‘बोलबच्चन हीच राऊतांची ओळख’

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना भारत गोगावले यांनी त्यांच्या निशाण्यावर संजय राऊत का आहेत ? यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, विधिमंडळात राऊतांवर बोलताना गोगावलेंकडून अपशब्द उच्चारण्यात आला यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुधवारी १ मार्च रोजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत, ‘ते बोलबच्चन करतात म्हणूनच […]

‘बोलबच्चन हीच राऊतांची ओळख’

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना भारत गोगावले यांनी त्यांच्या निशाण्यावर संजय राऊत का आहेत ? यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, विधिमंडळात राऊतांवर बोलताना गोगावलेंकडून अपशब्द उच्चारण्यात आला यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बुधवारी १ मार्च रोजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत, ‘ते बोलबच्चन करतात म्हणूनच त्यांना तिथे थारा आहे’, असे वक्तव्य भरत गोगावले यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ‘संजय राऊत रोज उठून नवीन आयडिया काढून काहीही बोलतात, यालाच जनता कंटाळली आहे पण ते बोलबच्चन करतात म्हणून त्यांना तिथे थारा आहे’, असे म्हणत भारत गोगावलेंनी राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत यांच्या ‘विधिमंडळ नव्हे, हे चोरमंडळ’ या वादग्रस्त विधानावर भारत गोगावले यांनी विधिमंडळात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. ‘मर्यादा ओलांडून वक्तव्य केले की, उद्रेक होतोच.’ ‘संजय राऊत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करतात पण आज त्यांनी विधिमंडळाला चोरमंडळ बोलून सीमा ओलांडली’, असे भरत गोगावले म्हणाले.
‘रोज काहीना काही चुकीचे वक्तव्य करून संजय राऊत यांनी संघटना संपवाण्याची सुपारी घेतली आहे’, असे वक्तव्यही त्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना केले. तसेच, ‘उद्धव गटाचे प्रमुख किंवा इतर कोणी काहीही सांगितले तरी राऊतांच्या विधानांना ते स्वतःच जबाबदार आहेत’ असेही भारत गोगावले म्हणाले.

 

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number