भारत बायोटेकची घोषणा; साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई

भारतात आजपासून सर्वात मोठ्या लसीकरणाला सुरवात झाली आहे. सीरमच्या ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना परवानगी देण्यात आलीय. लसीकरणादरम्यान काही केंद्रावर आज भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला विरोध झाल्याचं आढळून आलं. भारत सरकारने कोव्हॅक्सिकडून ५५ लास डोस करंदी केले आहेत. विरोधाच्या या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने ‘काही साईड इफेक्ट जाणवले तर याची नुकसान भरपाई कंपनी देईल […]

भारत बायोटेकची घोषणा; साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई

भारतात आजपासून सर्वात मोठ्या लसीकरणाला सुरवात झाली आहे. सीरमच्या ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना परवानगी देण्यात आलीय. लसीकरणादरम्यान काही केंद्रावर आज भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला विरोध झाल्याचं आढळून आलं. भारत सरकारने कोव्हॅक्सिकडून ५५ लास डोस करंदी केले आहेत. विरोधाच्या या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने ‘काही साईड इफेक्ट जाणवले तर याची नुकसान भरपाई कंपनी देईल अशी घोषणा केलीय.

एका पत्राद्वारे कंपनीने हि घोषणा केली. “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.” असं पत्रात म्हटलं गेलं आहे.

कोव्हॅक्सिनने पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायलमध्ये एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवली आहेत मात्र लसीच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे तर याच्या सोबतच कोव्हॅक्सिनची ट्रायलही सुरु आहे. लसीकरणादरम्यानच्या फॉर्ममध्ये म्हटलं आहे की, लस घेतली म्हणजे कोविड-१९ पासून बचावासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचंपालन करणं बंद केलं जाईल, असं कोणी समजून नये. याचबरोबर लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number