देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा   महाभारतातले दुशासन अजूनही जीवंत आहेत. रस्त्यारस्त्यांवर हे दुशासन टपून बसलेले दिसत आहे. भंडाऱ्याच्या आंधळगावात अशाच काही दुशासनांनी एका अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले. ही घटना १५ ऑगस्टला घडली.    शाळेत झेंडावंदन करुन ही मुलगी घरी निघाली तेव्हा या दुशासनांनी तीला वाटेतच अडवले. घरी सोडतो असे दाखवत तिला जबरदस्ती बाईकवर बसवले. पण तिला […]

देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

महाभारतातले दुशासन अजूनही जीवंत आहेत. रस्त्यारस्त्यांवर हे दुशासन टपून बसलेले दिसत आहे. भंडाऱ्याच्या आंधळगावात अशाच काही दुशासनांनी एका अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे केले. ही घटना १५ ऑगस्टला घडली. 

 

शाळेत झेंडावंदन करुन ही मुलगी घरी निघाली तेव्हा या दुशासनांनी तीला वाटेतच अडवले. घरी सोडतो असे दाखवत तिला जबरदस्ती बाईकवर बसवले. पण तिला हे झाडीत आडवाटेवर घेऊन गेले. तिथे या टोळक्यात अजूनही काही मुलगे आले. तिला अश्लिल शिवीगाळ करत, या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केला होता.

 

हा सर्व प्रकार यातल्याच एका तरुणाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. पीडित विद्यार्थिनीने घरी जाऊन आई वडिलांना या सर्व गोष्टीची कल्पना दिली, पण लग्न करायचं आहे, कशाला बदनामी असे म्हणत आई बाबांनीदेखील कानाडोळा केला. पण ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावाकऱ्यांनी  थेट पोलीस स्टेशन गाठले आणि या संबंधीच्या सर्व घटनेची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या टोळक्याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी ५ तरुणांना अटक केली आहे. हे सगळे तरुण 20 त 25 वयोगटातले असून गावातलेच आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number