Bhandara Fire News : भंडाऱ्यात आगीचा कहर; 4 लाख रूपयांच्या नोटांच्या बंडलांसह संपूर्ण घर भस्मसात…

भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कोसरा येथी पुष्पराज आबाजी हटवार (33) यांच्या घराला आग लागली या आगीत संपूर्ण घर जळाल्याने सर्वकाही भस्मसात झाले. शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

Bhandara Fire News : भंडाऱ्यात आगीचा कहर; 4 लाख रूपयांच्या नोटांच्या बंडलांसह संपूर्ण घर भस्मसात…

भंडारा: भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कोसरा येथी पुष्पराज आबाजी हटवार (33) यांच्या घराला आग लागली या आगीत संपूर्ण घर जळाल्याने सर्वकाही भस्मसात झाले. शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यात रोख रक्कम, दागिने यासह सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांनी मिळले त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र हे जुने घर मातीचे आणि लाकुड फाट्यांनी उभारलेले असल्याने आगीने काही वेळातच संपूर्ण घर कवेत घेतले. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना आणि अग्नीशामक दलाला पाचारण केले. पवनी येथील नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाने पोहचून आग विझविली. मात्र आगीतून काहीच वाचविता आले नाही. दरम्यान वीज वितरण कंपनीचे अधीकारी, पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, गावचे तलाठी आदींनी घटनास्थळाला भेट देऊ पहाणी आणि पंचनामा केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number