जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या मुंबईकरांचा बेस्ट प्रवासही महागणार आहे.
बेस्टच्या 2018-19च्या अर्थसंकल्पात दरवाढीचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यास येत्या आर्थिक वर्षापासून बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.
4 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी तिकीट दर वाढवण्याचं प्रस्तावित आहे. बेस्ट प्रवासाकरिता 1 ते 12 रुपये तिकीट आणि मासिक पाससाठी 40 ते 350 रुपये जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे.
आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टला तारण्यासाठी बेस्टनं प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला.