जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्ट कर्मचा-यांना आता पगार देणं शक्य नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी. बेस्ट दरवर्षी 1 हजार कोटी रुपये तोट्यात आहे.
10 हजार कोटी ओतूनही बेस्ट सेवेत काहीच फरक पडणार नाही. धाडसी पावलं उचलल्याशिवाय बेस्ट वाचू शकणार नाही, असं सांगतानाच दर महिन्याला १५० कोटी कर्ज काढलंय जातंय. बँकांनी पैसे न दिल्यास कर्मचा-यांचे पगारही होणार नाहीत, असंही ते म्हणाले. यासाठी अजोय मेहता यांनी, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करणे, ऑपरेशनमध्ये खासगीकरण करावे, बस खरेदी करायची नाही आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्यांच्या तिकीट दरात वाढ करावी, अशी त्रिसूत्री सुचविली आहे.
आयुक्तांनी आज सभागृहात बेस्टवर हे स्पष्टीकरण दिल्यानं सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेस्टवर प्रशासक नेमण्याची आवश्यकता असल्याचे संकेत यापूर्वी आयुक्तांनी दिले होते.