जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुढे ढकललाय. बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते.
औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कामगार कृती समितीस संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी गाड्या सुरु करण्याबाब बेस्ट कामगार संघटनांनी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर 5 मार्चला अंतिम सुनावणी होणाराय. त्यामुळे 5 मार्चपर्यंत बेस्ट कामगार कृती समिती आता संप करणार नाहीत.
मात्र, जर खासगी गाड्या बेस्ट मध्ये चालवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मात्र संप होणारच असं संघटनांनी म्हंटलय.