जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्ट प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बेस्ट भाडेवाढीला बेस्ट समितीनं मंजुरी दिलीये. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सुचविलेल्या सुधारणा बेस्ट समितीने अखेर मान्य केल्या आहेत.
बेस्ट बचावसाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार प्रवाशांच्या बसभाड्यात वाढ होणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये मंगळवारी हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कोणतीही वाढ नसून, त्यानंतर 1 रुपयापासून ते 12 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. त्याचबरोबर, बेस्ट बस पास दरातही वाढ होणार आहे.
किती किलोमीटरसाठी किती भाडेवाढ होणार?
सहा किमीसाठी सध्या भाडे – 14 रुपये , प्रस्तावित दर – 15 रुपये
आठ किमीसाठी सध्या भाडे – 16 रुपये, प्रस्तावित दर – 18 रुपये
दहा किमीसाठी सध्या भाडे – 16 रुपये, प्रस्तावित दर – 22 रुपये