Best Bus Accident: मुलुंड चेकनाका येथे भीषण अपघात; बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बस मुलुंड चेकनाका येथील वाहतूक सिग्नलवर थांबली होती. त्याचवेळी एक महिला पादचारी रस्ता ओलांडत होती.

Best Bus Accident: मुलुंड चेकनाका येथे भीषण अपघात; बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील मुलुंड चेकनाका परिसरात शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. बेस्ट बसच्या धडकेत एका महिला पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बेस्ट बस नेरुळ बस स्थानकावरून मुलुंड चेकनाका बस स्थानकाच्या दिशेने जात होती. बस मुलुंड चेकनाका येथील वाहतूक सिग्नलवर थांबली होती. त्याचवेळी एक महिला पादचारी रस्ता ओलांडत होती.

दरम्यान, सिग्नल हिरवा झाल्यानंतर बस पुढे सरकू लागली. यावेळी संबंधित महिलेला बसची धडक बसली. धडकेनंतर महिला रस्त्यावर कोसळली आणि बसच्या उजव्या बाजूचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, बसचालकाची भूमिका तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number