वंचितचे बेशरम झाड लावून आंदोलन

पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. अनेक रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.संत तुकाराम चौक ते कोठारी खदान, मलकापूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे जीवघेणे प्रकार घडू शकतात.या रस्त्यावर दिवस भर वर्दळ असल्याने अनेकांना ह्या खड्यांचा त्रास होत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यात साचल्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही नाहक […]

वंचितचे बेशरम झाड लावून आंदोलन

पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. अनेक रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.संत तुकाराम चौक ते कोठारी खदान, मलकापूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे जीवघेणे प्रकार घडू शकतात.या रस्त्यावर दिवस भर वर्दळ असल्याने अनेकांना ह्या खड्यांचा त्रास होत आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यात साचल्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास शान करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचा प्रयत्नात वाहनधारकांकडून पायी चालणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला आणि महानगरपालिका यांना वारंवार निवेदन देऊनही रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे . म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका विभागाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरम झाडांचे वृक्षारोपण करून मंगळवारी सकाळी ११;३० वाजता अंबिका नगर चौक येथे बेशरम झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number