Malai Cham Cham Recipe: बंगाली स्टाइल मलाई चमचम आता घरच्या घरी बनवा; मऊ, रसाळ आणि एकदम परफेक्ट

मलाई चमचम ही बंगाली मिठाई घरच्या घरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घ्या. मऊ, रसाळ आणि क्रीमी चव असलेली ही मिठाई सणांसाठी किंवा खास प्रसंगांसाठी परफेक्ट आहे.

Malai Cham Cham Recipe: बंगाली स्टाइल मलाई चमचम आता घरच्या घरी बनवा; मऊ, रसाळ आणि एकदम परफेक्ट

Malai Cham Cham Recipe: 

मलाई चमचम ही एक अप्रतिम बंगाली मिठाई असून तिची चव आणि मऊ, स्पंजी टेक्स्चर प्रत्येकाला आवडते. ताज्या छेनापासून तयार केलेले चमचम साखरेच्या पाकात शिजवून त्यात क्रीमी मलाई स्टफिंग भरले जाते, त्यामुळे प्रत्येक घास अधिकच स्वादिष्ट लागतो. सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी ही मिठाई घरच्या घरी बनवली तर आनंद दुप्पट होतो. दिसायला आकर्षक आणि चवीला स्वादिष्ट असलेली मलाई चमचम घरच्याघरी कशी तयार करायची जाणून घ्या सविस्तर

हेही वाचा:हेही वाचा: Tomato Saar Recipe : रोज तेच तेच खाऊन कंटाळलात का? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा

साहित्य:
चमचम साठी:
1 लिटर दूध
2 टेबलस्पून लिंबाचा रस / व्हिनेगर
1 कप साखर
मलाई (स्टफिंग) साठी:
1/2 कप मावा (खोवा)
2 टेबलस्पून पिठीसाखर
1/2 टीस्पून वेलची पूड
2 टेबलस्पून ताजी क्रीम
सजावटीसाठी:
पिस्ता/बदाम काप
केशर दूध

हेही वाचा: Tomato Saar Recipe : रोज तेच तेच खाऊन कंटाळलात का? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा

कृती:
दूध उकळून त्यात लिंबाचा रस घाला.
दूध फाटल्यावर कापड्याच्या साहाय्याने गाळून पाणी काढा.
छेना थंड पाण्याने धुऊन 30 मिनिटं बांधून ठेवा.
त्यानंतर छेना 8–10 मिनिटं मऊ होईपर्यंत मळा.
लांबट आकाराचे गोळे बनवा.
साखरेचा पाक बनवण्यासाठी पाणी आणि साखर उकळा.
पाकात गोळे टाकून 10–15 मिनिटे झाकण ठेवून शिजवा.
मलाईच्या स्टफिंगसाठी मावा, पिठीसाखर, वेलची पूड आणि क्रीम मिक्स करून मऊ मिश्रण तयार करा.
शिजलेले चमचम थंड झाल्यावर मधून हलकेच कापून त्यात मलाई मिश्रण भरा.
सजावटीसाठी वरून केशर दूध आणि ड्रायफ्रूट्स टाका.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number