‘ग्रीन टी’चे फायदे

ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर यामुळे कर्करोग, अतिरिक्त रक्तदाब आणि ह्रदयरोगाच्या रुग्णांनाही फायदा होतो. परंतू ग्रीन टी पिताना बऱ्याचदा आपण चुका करत असतो , तर जाणून घेऊया गतीनं टी पिताना जॅकोणत्या चुका करू नये: ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका १. अनोशेपोटी ग्रीन टी पिणे सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करत असाल, तर […]

‘ग्रीन टी’चे फायदे

ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्याचबरोबर यामुळे कर्करोग, अतिरिक्त रक्तदाब आणि ह्रदयरोगाच्या रुग्णांनाही फायदा होतो. परंतू ग्रीन टी पिताना बऱ्याचदा आपण चुका करत असतो , तर जाणून घेऊया गतीनं टी पिताना जॅकोणत्या चुका करू नये:

ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करु नका

१. अनोशेपोटी ग्रीन टी पिणे

सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करत असाल, तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. अनोशेपोटी ग्रीन टी प्यायल्याने पोटात अॅसिड वाढते. त्यामुळे पचनाशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक खा.
२. जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे

ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात असे जरी असले तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अत्यंत वाईट मानला जातो. ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

३. रात्री झोपताना ग्रीन टी पिणे

ग्रीन टीमध्ये कॅफिनचा समावेश असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.

४. जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे

जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे अन्नातील लोहाचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला ग्रीन टी प्यायची असेल तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.

५. टी बॅग पुन्हा वापरणे

ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे सक्तपणे टाळले पाहिजे. कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने पुरेसे पोषण मिळत नाही. तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number