पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ७००० पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षितेची काळजी पोलीसांच्या वतीने घेतली जाते. आपल्या पोलीस बांधवांना मोफत जेवण देण्यासाठी वामन यलमार व त्यांच्या पत्नी यांनी पुढाकार घेतला आहे. यलमार यांच्या पत्नीचे बचत गट तसेच मित्र मंडळ यांच्या माध्यमातून एकत्रित येऊन पोलिसांना नाश्ता व दोन वेळचे जेवण दिले जात आहे. पंढरपुरात कायमच पोलिसांच्या राहण्याच्या आणि जेवणाची वारी काळात मोठी अडचण निर्माण होते. याच अडचणीवर आता पंढरपूरच्या पोलीस कुटुंबाने मित्रमंडळी व बचत गट महिलांच्या माध्यमातून मात देत वारकरी भक्तांची सेवा करणाऱ्या पोलिसांच्या पोटाची सेवा करत एकप्रकारे विठ्ठलाचा प्रसाद देण्याचे काम करत आहेत.