बेलेश्वर मंदिराचं छत कोसळलं

इंदूरमधील स्नेह नगरजवळ असलेल्या पेटल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिर आहे. रामनवमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती. याच वेळेच येथील विहिरीवर बांधलेला स्लॅब कोसळला. त्यामुळे या स्लॅबवर उभे असलेले २५ लोक विहिरीमध्ये पडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक पोलिसही घटनास्थळी आहेत. याचप्रमाणे फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात […]

बेलेश्वर मंदिराचं छत कोसळलं

इंदूरमधील स्नेह नगरजवळ असलेल्या पेटल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिर आहे. रामनवमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती. याच वेळेच येथील विहिरीवर बांधलेला स्लॅब कोसळला. त्यामुळे या स्लॅबवर उभे असलेले २५ लोक विहिरीमध्ये पडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक पोलिसही घटनास्थळी आहेत. याचप्रमाणे फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आलं असून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

दुर्घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळानंतर मदतकार्य करणाऱ्या टीम येथे दाखल झाल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. सध्या विहिरीमध्ये पडलेल्यांना शोधण्याचा आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मंदिरामध्ये यज्ञ सुरु होतं. त्यामुळे बरेच भाविक या विहिरीवरील स्लॅबवर उभे होते. त्याचवेळी जास्त वजनामुळे हा स्लॅब कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती असून चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळेच मदतकार्य पोहचवणाऱ्या टीम्सला मंदिराच्या अधिकजवळपर्यंत जाण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या विहिरीमध्ये पडलेल्या काही भाविकांना वर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्यवर नजर ठेऊन आहेत. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून त्यामुळेही मदतकार्यामध्ये अडथळा येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number